आजचे राशीभविष्य : मेषसाठी मानहानीचा प्रसंग उद्भवेल, तूळसाठी नोकरीत पदोन्नती संभवते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:09 IST2023-03-31T07:08:32+5:302023-03-31T07:09:05+5:30
Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य : मेषसाठी मानहानीचा प्रसंग उद्भवेल, तूळसाठी नोकरीत पदोन्नती संभवते
मेष: आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. आणखी वाचा
वृषभ: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. आणखी वाचा
मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
कर्क: आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. आणखी वाचा
सिंह: आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. आणखी वाचा
कन्या: आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. आणखी वाचा
तूळ: आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आणखी वाचा
वृश्चिक: आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. आणखी वाचा
धनु: आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. आणखी वाचा
मकर: आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. आणखी वाचा
मीन: आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा