आजचे राशीभविष्य : वृषभसाठी व्यवहारात अडचणी येतील तर मिथुनसाठी आर्थिक लाभाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 07:12 IST2023-03-30T07:11:43+5:302023-03-30T07:12:21+5:30

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope - March 30, 2023 : For Taurus there will be difficulties in business, while for Gemini there will be opportunities for financial gain, Check Details... | आजचे राशीभविष्य : वृषभसाठी व्यवहारात अडचणी येतील तर मिथुनसाठी आर्थिक लाभाची संधी

आजचे राशीभविष्य : वृषभसाठी व्यवहारात अडचणी येतील तर मिथुनसाठी आर्थिक लाभाची संधी

मेष: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल.  आणखी वाचा 

वृषभ: आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्चे दरम्यान संघर्ष होऊ शकतो. आणखी वाचा 

मिथुन: आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. आणखी वाचा 

सिंह: आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा 

कन्या: सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ संभवतो. आणखी वाचा 

तूळ:  आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा 

वृश्चिक:  सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही.  आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. स्वादिष्ट भोजन व सुंदर वस्त्र लाभल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा 

मकर: आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. आणखी वाचा 

कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. आणखी वाचा 

मीन: आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. नोकरीत काळजीचे वातावरण राहील. आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope - March 30, 2023 : For Taurus there will be difficulties in business, while for Gemini there will be opportunities for financial gain, Check Details...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app