Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२२, नवीन काम सुरू करण्यास अनुकूल दिवस, व्यापारात लाभ होईल, जुने येणे वसूल होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 07:51 IST2022-06-30T07:50:53+5:302022-06-30T07:51:18+5:30

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

Today's horoscope, June 30, 2022, favorable day to start a new job, trade will benefit, old arrivals will be recovered | Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२२, नवीन काम सुरू करण्यास अनुकूल दिवस, व्यापारात लाभ होईल, जुने येणे वसूल होईल

Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२२, नवीन काम सुरू करण्यास अनुकूल दिवस, व्यापारात लाभ होईल, जुने येणे वसूल होईल

मेष -  आजचा दिवस नोकरी व्यवसायात स्पर्धेचा राहील. त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न कराल. त्यातून सुद्धा नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल, व ते सुरूही कराल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा 

वृषभ -  आज द्विधा मनस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचा वेळ खर्ची घालावा लागेल. हट्टी स्वभाव न सोडल्यास चर्चेदरम्यान संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणखी वाचा 

मिथुन -  आजच्या दिवसाचा प्रारंभ मन आणि शरीराच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत घरात किंवा बाहेर मनपसंद जेवणाचा आनंद लुटाल. आर्थिक लाभाची संधी आहे. आणखी वाचा 

कर्क -   आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा  

सिंह - कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेता न आल्याने आलेल्या संधीचा  फायदा घेता येणार नाही. मन विचारात अडकून पडेल. मित्रांकडून विशेषत: स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा   

कन्या -  आजचा दिवस नवीन काम करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. आणखी वाचा 

तूळ -  आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीविषयी काळजी वाटेल. दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा

वृश्चिक -  आजचा दिवस शांततेत आणि सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयश येण्याची शक्यता असल्याने नवीन काम सुरू करू नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा 

धनू  -  आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. मित्रांसोबत एखादा प्रवास एखादी सहल ठरवाल. आणखी वाचा   

मकर -   आजचा दिवस व्यापार आणि व्यवसायातील नियोजनासाठी अनुकूल आहे. वसुली-तसेच आर्थिक देवाण घेवाणीत यश मिळेल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. आणखी वाचा 

कुंभ -  आजचा दिवस मानसिक अशांतता आणि उद्विग्नतेने भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील. त्यामुळे निर्णायकता असणार नाही. आणखी वाचा 

मीन -  आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope, June 30, 2022, favorable day to start a new job, trade will benefit, old arrivals will be recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app