Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ, नियोजनासाठी अनुकूल दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:13 IST2022-06-29T08:12:46+5:302022-06-29T08:13:17+5:30

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

Today's horoscope, June 29, 2022, will bring happiness and contentment in married life. Financial benefits, favorable days for planning | Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ, नियोजनासाठी अनुकूल दिवस

Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ, नियोजनासाठी अनुकूल दिवस

मेष - आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी-व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. आणखी वाचा   

वृषभ -  आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. आणखी वाचा 

मिथुन -   आजचा दिवस उत्साह आणि स्फुर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तांचा सहवास यामुळे दिवस खूप आनंदात जाईल. दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ आणि नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आणखी वाचा 

कर्क -   आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनस्थिती राहिल्याने महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका आणखी वाचा 

सिंह -   आजचा दिवस आपणासाठी लाभदायी ठरेल. मात्र मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही, याची काळजी घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. आणखी वाचा 

कन्या -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होवू शकाल. व्यापारी आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. मान-सन्मान होतील. आणखी वाचा 

तूळ -  व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी, व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल.  आणखी वाचा 

वृश्चिक -  उक्ती आणि कृती यावर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा 

धनू  -  मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. दाम्पत्य जीवनात सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान प्रसिद्धी मिळेल. आणखी वाचा 

मकर -  आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी असल्याने आर्थिक देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबित लोकांचे सहकार्य मिळेल.  आणखी वाचा 

कुंभ -   आज आपण संतती आणि स्वत:चे स्वास्थ्य  याबाबत चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल.  आणखी वाचा 

मीन -     शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद होतील. नको त्या घटनांमुळे उत्साह कमी होईल. आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope, June 29, 2022, will bring happiness and contentment in married life. Financial benefits, favorable days for planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app