आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 07:05 IST2025-07-24T07:05:35+5:302025-07-24T07:05:58+5:30

Todays Horoscope: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य!

Today's Horoscope July 24, 2025: There will be financial gains and increase in income, will be a sudden change in thinking. | आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील

आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील

मेष - चंद्र आज 24 जुलै, 2025 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आपल्या विचारात एकदम बदल होईल. दुपार नंतर मात्र मनाचा खंबीरपणा कमी होऊन मन विचारात गढून जाईल. मानसिक शैथिल्य जाणवेल. आणखी वाचा 

वृषभ - आज 24 जुलै, 2025 गुरूवार च्या दिवशी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील. व्यापार- व्यवसायात वातावरण अनुकूल असल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आणखी वाचा

सिंह - आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल. दुपार नंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता आहे. एखादी मानसिक चिंता सतावेल. कुटुंबीय व संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. आणखी वाचा

कन्या -  आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. दुपार नंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. जवळपासच्या एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाल. आणखी वाचा

तूळ - आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. वरिष्ठांची मर्जी संपादन केल्याने पदोन्नती मिळविण्याचा आपला मार्ग सुकर होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपले बोलणे संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. पोटदुखीच्या विकाराने त्रस्त व्हाल. व्यावसायिक क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात.  आणखी वाचा

धनु - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपार नंतर मात्र मनात नकारात्मक विचारांचे वादळ निर्माण होईल. व त्यामुळे मन दुःखी होईल. रागाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

मकर - आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. दुपार नंतर स्वकीय व मित्र यांच्या सहवासात आनंदित होऊ शकाल. वाहनसौख्य मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

कुंभ - आज आपल्यात कले विषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील. व्यापार -व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आणखी वाचा

मीन - आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वस्थता जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope July 24, 2025: There will be financial gains and increase in income, will be a sudden change in thinking.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app