आजचे राशीभविष्य - 20 फेब्रुवारी 2023; नशिबाची साथ मिळेल, व्यापारात फायदा; तुमच्या राशीत काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 07:22 IST2023-02-20T07:13:48+5:302023-02-20T07:22:41+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - February 20, 2023; Will be supported by luck, gain in business; What about your zodiac sign? | आजचे राशीभविष्य - 20 फेब्रुवारी 2023; नशिबाची साथ मिळेल, व्यापारात फायदा; तुमच्या राशीत काय

आजचे राशीभविष्य - 20 फेब्रुवारी 2023; नशिबाची साथ मिळेल, व्यापारात फायदा; तुमच्या राशीत काय

मेष - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आणखी वाचा

वृषभ - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज परदेशस्थ स्नेहीजनांकडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्याना चांगली संधी प्राप्त होईल. आणखी वाचा

मिथुन - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. आणखी वाचा 

सिंह - आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. आणखी वाचा

कन्या - आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. आणखी वाचा

तूळ - आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. आणखी वाचा

धनु - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. आणखी वाचा

मकर - आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आणखी वाचा

कुंभ - आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. आणखी वाचा

मीन - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल. आणखी वाचा

 

Open in app

Web Title: Today's Horoscope - February 20, 2023; Will be supported by luck, gain in business; What about your zodiac sign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.