आजचे राशीभविष्य, ११ जुलै २०२५: नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल दिवस, वाचा आजचे राशीभविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 08:10 IST2025-07-11T08:10:00+5:302025-07-11T08:10:56+5:30
Daily Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा जाणार, ठरवलेली कामे होण्याची योग आहे का? जाणून घ्या तुमची राशी काय सांगतेय...

आजचे राशीभविष्य, ११ जुलै २०२५: नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल दिवस, वाचा आजचे राशीभविष्य
मेष - आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
आणखी वाचा
वृषभ - आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी उदभवतील.
आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील.
आणखी वाचा
कर्क - आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.
आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो.
आणखी वाचा
कन्या - आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल.
आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपार नंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील.
आणखी वाचा
वृश्चिक - कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपार नंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.
आणखी वाचा
धनु - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो.
आणखी वाचा
मकर - आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. अपघाताची शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे लागेल.
आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल.
आणखी वाचा
मीन - नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात.
आणखी वाचा