आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२४: नशिबाची साथ मिळेल, अचानक धनलाभ संभवतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 07:18 IST2024-12-06T07:16:58+5:302024-12-06T07:18:08+5:30

Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या

Today's Horoscope - December 6, 2024: Luck will favor you, sudden wealth is possible | आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२४: नशिबाची साथ मिळेल, अचानक धनलाभ संभवतो

आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२४: नशिबाची साथ मिळेल, अचानक धनलाभ संभवतो

मेष: आज चंद्र 06 डिसेंबर, 2024 शुक्रवारी मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा. आणखी वाचा 

वृषभ: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्याना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळे मनास आनंद होईल. आणखी वाचा 

मिथुन: आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक चणचण जाणवेल. आणखी वाचा 

कर्क: आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील.  आणखी वाचा 

सिंह: आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.  आणखी वाचा 

कन्या: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आणखी वाचा 

तूळ: आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. आणखी वाचा 

धनु: आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल. आणखी वाचा 

मकर:  आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यावा. आणखी वाचा 

कुंभ: आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. वाणी व राग ह्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा 

मीन: आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - December 6, 2024: Luck will favor you, sudden wealth is possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app