आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 07:33 IST2023-12-05T07:32:29+5:302023-12-05T07:33:40+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - December 5, 2023, Honor and reputation will increase, may also get promotion in job | आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते

आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते

मेष - आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही.  आणखी वाचा 

वृषभ - आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल.  आणखी वाचा

मिथुन  - आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील.  आणखी वाचा

कर्क  - आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. आणखी वाचा 

सिंह - आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. आणखी वाचा  

कन्या -  आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल.  आणखी वाचा 

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल.  आणखी वाचा   

वृश्चिक -   आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते.  आणखी वाचा 

धनु -   आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे.  आणखी वाचा

मकर - आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा  

कुंभ -  आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल.  आणखी वाचा 

मीन -   आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. आणखी वाचा 

Open in app

Web Title: Today's Horoscope - December 5, 2023, Honor and reputation will increase, may also get promotion in job