आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 07:06 IST2025-12-04T07:05:49+5:302025-12-04T07:06:46+5:30

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य

Today's Horoscope, December 4, 2025: There will be sudden wealth and various benefits, which will make you happy. | आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल

आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल

मेष- आज चंद्र 04 डिसेंबर, 2025 गुरूवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकावेत. आणखी वाचा 

वृषभ-  आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम दांपत्यजीवनाचा आनंद मिळेल. आणखी वाचा

मिथुन- आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टीं पासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. आणखी वाचा

कर्क- आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी ह्यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. आणखी वाचा

सिंह-  आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभ संभवतो. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. आणखी वाचा

कन्या- आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. संतती विषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील.  आणखी वाचा

तूळ- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रहस्यमय व गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. भिन्नलिंगी व्यक्ती व पाण्यापासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा

वृश्चिक- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे आज आपण खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने आपले मन प्रफुल्लित होईल. आणखी वाचा

धनु- आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आणखी वाचा

मकर- आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. संतती विषयी चिंतीत व्हाल. कुटुंबातील थोरांची प्रकृती बिघडू शकते. शारीरिक दृष्टया अस्वस्थ राहाल. आणखी वाचा

कुंभ- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर - संपत्ती किंवा वाहन ह्यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. महिलांचा सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी खर्च होईल. आणखी वाचा

मीन- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. मित्र व कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाल. भावंडां कडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील.  आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 4 दिसंबर 2025: अचानक धन और विभिन्न लाभ।

Web Summary : मेष राशि वालों को पारिवारिक कलह का सामना करना पड़ेगा, वृषभ राशि वाले घरेलू सुख का आनंद लेंगे, मिथुन राशि वालों को गलतफहमी होगी। कर्क राशि वालों को आर्थिक लाभ की उम्मीद है, सिंह राशि वालों को व्यवसाय में सफलता मिलेगी, कन्या राशि वालों को चुनौतियों का सामना करना पड़ेगा। तुला राशि वालों को सावधान रहना चाहिए, वृश्चिक राशि वाले सामाजिक समारोहों का आनंद लेंगे, धनु राशि वाले खुश रहेंगे। मकर राशि वाले बेचैन महसूस करेंगे, कुंभ राशि वाले संवेदनशील रहेंगे और मीन राशि वालों का दिन फलदायी होगा।

Web Title : Horoscope for December 4, 2025: Sudden wealth and various gains.

Web Summary : Aries faces family conflicts, Taurus enjoys domestic bliss, Gemini encounters misunderstandings. Cancer anticipates financial gains, Leo finds success in business, Virgo experiences challenges. Libra should be cautious, Scorpio enjoys social outings, Sagittarius finds happiness. Capricorn feels restless, Aquarius is sensitive, and Pisces will have a productive day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.