Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 07:35 IST2025-12-15T07:34:11+5:302025-12-15T07:35:06+5:30
Daily Horoscope in Marathi : आठवड्याची सुरुवात कशी होणार, पहिल्याच दिवशी कोणत्या गोष्टी घडण्याची शक्यता, कोणत्या टाळाव्या लागणार? वाचा तुमची राशी काय सांगतेय...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ
मेष: आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे - फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल. वाद - विवादापासून दूर राहणे हिताचे ठरेल.
आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आजारापासून सुटका होईल. नोकरदारांना लाभ होईल. सहकार्यांचे सहकार्य मिळेल.
आणखी वाचा
मिथुन: आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. उत्तम भोजन व वैवाहिक सुख मिळेल.
आणखी वाचा
कर्क: आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशयापासून दूर राहावे.
आणखी वाचा
सिंह: मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण खुश व्हाल. शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ करा.
आणखी वाचा
कन्या: गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. हौस - मौज ह्यावर खर्च होईल. अवैध प्रवृत्ती पासून दूर राहावे.
आणखी वाचा
तूळ: आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास व कार्य साफल्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात गोडी राहील.
आणखी वाचा
वृश्चिक: आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल.
आणखी वाचा
धनु: आजचा दिवस लाभदायक आहे. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. मित्रांसह एखाद्या पर्यटनाचा बेत ठरेल. उत्तम भोजन प्राप्ती मुळे आनंद वाटेल.
आणखी वाचा
मकर: आज व्यापार - व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते.
आणखी वाचा
कुंभ: शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौज - मस्ती हिंडण्या - फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. विदेशातून आनंददायी बातम्या येतील.
आणखी वाचा
मीन: आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल.
आणखी वाचा
