Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ डिसेंबर २०२५: अचानक धनलाभाचा योग, प्रकृतीचा त्रास होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 07:32 IST2025-12-11T07:31:43+5:302025-12-11T07:32:47+5:30
Today's Horoscope 11 december 2025: आज तुमचा दिवस कसा जाणार, ठरवलेली कामे होणार का, घरातील वातावरण कसे असेल, वाचा तुमची रास काय सांगतेय?

Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ डिसेंबर २०२५: अचानक धनलाभाचा योग, प्रकृतीचा त्रास होणार
मेष: आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामात यश लाभेल.
आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आणखी वाचा
मिथुन: नोकरीत वरिष्ठ अधिकार्याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. नशीबाची साथ मिळेल. जवळपासचे प्रवास घडतील.
आणखी वाचा
कर्क: आज गैरसमज व नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. धन खर्च होईल.
आणखी वाचा
सिंह: आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. स्वभावात संताप व वागण्यात तापटपणा राहील. त्यावर नियंत्रण ठेवावे. डोकेदुखी व पोटाचे आजार बळावतील.
आणखी वाचा
कन्या: आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक चिंतेत दिवस जाईल. कुटुंबीय व मित्रांशी पटणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. कोर्ट - कचेरी व नोकरांपासून जपून राहावे लागेल.
आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस शुभफलदायी व लाभदायी आहे. पत्नी व संतती यांच्याकडून सुखा - समाधानाचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
आणखी वाचा
वृश्चिक: आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल. व्यापार्याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
आणखी वाचा
धनु: आज आपणाला प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. नोकरी - व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे.
आणखी वाचा
मकर: आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळे अनेक संकटांपासून वाचाल. आहारावर विशष लक्ष न दिल्यास प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल.
आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. भिन्नलिंगी व्यक्तीशी परिचय होऊन त्याचे परिवर्तन प्रणयात होण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
मीन: मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. राग व बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. आजारी व्यक्तीची प्रकृती सुधारेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा अनुभव येईल.
आणखी वाचा
