आजचे राशीभविष्य : बुधवार २५ मार्च २०२६; व्यापारात आर्थिक लाभ संभवतो, नवीन कार्य हाती घेऊ शकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 07:59 IST2026-03-25T07:46:47+5:302026-03-25T07:59:01+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 25 March 2026 | आजचे राशीभविष्य : बुधवार २५ मार्च २०२६; व्यापारात आर्थिक लाभ संभवतो, नवीन कार्य हाती घेऊ शकाल

आजचे राशीभविष्य : बुधवार २५ मार्च २०२६; व्यापारात आर्थिक लाभ संभवतो, नवीन कार्य हाती घेऊ शकाल


मेष - आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक व कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपार नंतर मात्र चिंता वाढतील व त्यामुळे उत्साह कमी होईल. आणखी वाचा

वृषभ - महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील व त्यामुळे आलेली एखादी संधी हातून निसटेल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क - आजची सकाळ कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. एखाद्या स्त्रीमुळे लाभ होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल. आणखी वाचा

तूळ - कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. आणखी वाचा

वृश्चिक - आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. परदेशस्थ नातेवाईकांकडून काही आनंददायी बातम्या येतील. आणखी वाचा

मकर -आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. स्त्रियांना माहेर कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आणखी वाचा

कुंभ - आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. प्रकुतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

मीन - आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा






 

Open in app

Web Title : आज का राशिफल: 25 मार्च, 2026; व्यापार में आर्थिक लाभ संभव।

Web Summary : आज मिलाजुला दिन है। कुछ राशियों को आर्थिक लाभ, नए अवसर मिलेंगे। पारिवारिक सौहार्द में उतार-चढ़ाव। सर्वोत्तम परिणामों के लिए सकारात्मकता पर ध्यान दें। स्वास्थ्य पर ध्यान दें।

Web Title : Horoscope Today: March 25, 2026; Financial gains in business possible.

Web Summary : Mixed day. Some signs see financial gains, new opportunities. Family harmony fluctuates. Focus on positivity for best outcomes. Health requires attention.