आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 08:13 IST2024-10-16T08:04:46+5:302024-10-16T08:13:30+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 16 October 2024 | आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता


मेष - आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क -  आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा 

सिंह - आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सलोख्याचे राहतील. उत्तम भोजन, वस्त्रालंकार व वाहनप्राप्ती होईल. आणखी वाचा

तूळ - आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. सहकारी व हाताखालचे नोकर यांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील. आणखी वाचा

धनु - आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. आणखी वाचा

मकर - आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. आणखी वाचा

कुंभ - मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा

मीन - आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा

Open in app

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 16 October 2024