आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2022; नशिबाची साथ मिळेल, आर्थिक फायदा होईल आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 07:48 IST2022-11-29T07:48:00+5:302022-11-29T07:48:30+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2022; नशिबाची साथ मिळेल, आर्थिक फायदा होईल आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
मेष - मकर राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्या संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला - मसलात कराल. आणखी वाचा
वृषभ - मकर राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
मिथुन - मकर राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा
कर्क - मकर राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रकृती उत्तम राहील.आणखी वाचा
सिंह - मकर राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. आज उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल. आणखी वाचा
कन्या - मकर राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. बोलताना बौद्धीक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते. आणखी वाचा
तूळ - मकर राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. पाण्या पासून दूर राहणे हितावह राहील. कौटुंबिक तसेच जमीन - जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक - मकर राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्यांकडून सौख्य व आनंद मिळेल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
धनु - मकर राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. दूर राहणार्या नातलगांशी संपर्क साधू शकाल. कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा
मकर - मकर राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंददित व्हाल. एखादा अपघात संभवतो. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा
कुंभ - मकर राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. कुटुंबियांशी पटणार नाही. गैरसमज, दुर्घटना यापासून जपून राहावे. एखाद्याचे भले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होण्याची वेळ येईल. आणखी वाचा
मीन - मकर राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. एखादी आनंददायी बातमी समजेल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. नवीन व महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा