आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2023; आज नशिबाची साथ मिळेल, प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 08:16 IST2023-02-14T07:57:52+5:302023-02-14T08:16:35+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya tuesday 14 February 2023 | आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2023; आज नशिबाची साथ मिळेल, प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल

आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2023; आज नशिबाची साथ मिळेल, प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल

मेष - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. समाधानि वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे. आणखी वाचा

वृषभ - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कुंभ संक्राती पासून एक महिन्या पर्यंत आपण व्यस्त राहाल. उपाय:-सूर्य देवास कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावा. आणखी वाचा

मिथुन - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थते मुळे उत्साहात कमतरता जाणवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला आहे. कुंभ संक्राती पासून एक महिन्या पर्यंत आपल्या साहसी वृत्तीत वाढ होईल. ह्या दरम्यान आपणास अनेक कार्यातून लाभ प्राप्ती होईल. तसेच आपण एखादी नवीन जोखीम सुद्धा पत्करू शकाल. उपाय:-रविवारी गायीस गूळ व पोळी खाऊ घालावी. आणखी वाचा

कर्क - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशया पासून दूर राहावे. सूर्याचे कुंभेतील भ्रमण आपल्यासाठी त्रासदायी होऊ शकते. ह्या महिन्यात कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ नये.  उपाय:-शंकरास रोज जलाभिषेक करावा. आणखी वाचा 

सिंह - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. उपाय:-सूर्याष्टकाचे पठन करावे. आणखी वाचा

कन्या - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल. उपाय:-गायत्री चालिसाचे पठन करावे. आणखी वाचा

तूळ - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल. उपाय:-रोज सूर्याच्या १२ नावांचा जप करावा. आणखी वाचा

वृश्चिक - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या स्वभावातील तामसवृत्ती व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर काम लांबणीवर टाका. आनंद - उल्हास ह्यासाठी खर्च कराल. उपाय:-गायीस रोज गूळ खाऊ घालावा. आणखी वाचा

धनु - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख - शांती नांदेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल. उपाय:-सूर्य गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा. आणखी वाचा

मकर - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. कुटुंब व संतती यांच्याविषयी आपणाला आनंद व समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल व ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान - प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. उपाय:-रोज सूर्यास अर्घ्य द्यावा. आणखी वाचा

कुंभ - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंद - मौजमजा ह्यासाठी पैसा खर्च होईल. संतती विषयक काळजी राहील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल. उपाय:-सूर्याष्टकाचे पठन करावे. आणखी वाचा

मीन - चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळे अडचणीत याल. योग्य विचार व काम आपणास वाईट मार्गावर जाण्या पासून थोपवतील. उपाय:-रोज शंकराचे पूजन करावे. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya tuesday 14 February 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app