आजचे राशीभविष्य - 4 डिसेंबर 2022; मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 07:43 IST2022-12-04T07:18:48+5:302022-12-04T07:43:00+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 4 डिसेंबर 2022; मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस
मेष - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल. जमीन, घर इत्यादींच्या कागदपत्रात फसवणूक होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृषभ - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. आणखी वाचा
मिथुन - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्या कडून लाभ होईल. आणखी वाचा
कर्क - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नोकरीत सुद्धा लाभ होतील.आणखी वाचा
सिंह - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. आणखी वाचा
कन्या - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. पती - पत्नीतील दुरावा संपून जवळीक निर्माण होईल. आणखी वाचा
तूळ - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. माता - पिता ह्यांच्या कडून काही चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
धनु - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. आणखी वाचा
मकर - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपण शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल. आणखी वाचा
कुंभ - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. नकारात्मक विचार दूर करा. आणखी वाचा
मीन - चंद्र आज मीन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. प्रवासाची शक्यता आहे. तन - मनाने प्रसन्न राहाल. आणखी वाचा