आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 07:42 IST2026-01-11T07:36:03+5:302026-01-11T07:42:00+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 11 January 2026 | आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 

आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 


मेष - आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे - फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात - निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आणखी वाचा

मिथुन - आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. आणखी वाचा

कर्क - आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. आणखी वाचा 

सिंह - आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा

कन्या - आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांनाआजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

तूळ - आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आपली कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र व कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. आणखी वाचा

मकर - आज व्यापार - व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. आणखी वाचा

कुंभ - शारीरिक दृष्ट्या थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौज - मस्ती हिंडण्या - फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील. आणखी वाचा

मीन - आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात सुद्धा प्रतिकूलता जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल: 11 जनवरी, 2026; आर्थिक लाभ, प्रियजनों के साथ खुशी

Web Summary : 11 जनवरी, 2026 के लिए राशिफल भविष्यवाणियां प्रत्येक राशि के लिए विविध अनुभवों का संकेत देती हैं। कुछ को आर्थिक लाभ और सामंजस्यपूर्ण संबंधों का आनंद मिलेगा, जबकि अन्य को स्वास्थ्य और खर्चों के बारे में सावधान रहना चाहिए। कुल मिलाकर, मिश्रित भाग्य का दिन अपेक्षित है।

Web Title : Today's Horoscope: January 11, 2026; Financial Gains, Happiness with Loved Ones

Web Summary : Horoscope predictions for January 11, 2026, indicate varied experiences for each zodiac sign. Some will enjoy financial gains and harmonious relationships, while others should be cautious about health and expenses. Overall, a day of mixed fortunes is expected.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.