आजचे राशीभविष्य - 3 जून 2023; या लोकांसाठी धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, यांना प्रेमात मिळेल अपेक्षित प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 07:53 IST2023-06-03T07:50:55+5:302023-06-03T07:53:07+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 3 june 2023 | आजचे राशीभविष्य - 3 जून 2023; या लोकांसाठी धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, यांना प्रेमात मिळेल अपेक्षित प्रतिसाद 

आजचे राशीभविष्य - 3 जून 2023; या लोकांसाठी धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, यांना प्रेमात मिळेल अपेक्षित प्रतिसाद 


मेष- नोकरीत तुम्हाला विविध प्रकारचे लाभ होतील. विविध सुख सुविधा मिळतील. मात्र, काही कामात दगदग होईल. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. त्यातून मार्ग काढण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

वृषभ- आपल्या अनेक अडचणी दूर होतील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. व्यवसायात बरकत राहील. मालाची विक्री चांगली होईल. जवळच्या सहलीला जाऊन याल. भावडांच्या भेटीगाठी होतील. मनात आनंदी विचार राहतील.

मिथुन - महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. काही जवळचे लोक तुमच्याशी स्पर्धा करतील. तब्येतीची काळजी घ्या. आवडल्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. मात्र, थोडा हात आखडता घेऊनच ताव मारा. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

कर्क - मनात आनंदी विचार राहतील. नवीन कल्पना विकसित केल्या जातील. मुलाची प्रगती होईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल.

सिंह- कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. मनात आत्मविश्वास राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. कामानिमित्त फिरणे होईल, मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

कन्या- जवळच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या समवेत मौजमजा करता येईल. आर्थिक आवक चांगली राहील. अचानक एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. भेटवस्तू मिळतील. व्यवसायात सतत व्यस्त राहाल.

तूळ - महत्वाच्या कामात सोप्या रीतीने यश मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. जुन्या मित्रमंडळीच्या भेटीगाठी होतील.

वृश्चिक- तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. कामात उत्साह राहील. आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. लोक तुमची प्रशंसा करतील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

धनू - हाती घेतलेल्या काही कामात किरकोळ स्वरुपाच्या अडचणी येतील, काहीना प्रवास घडून येईल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना तुमची गोपनीय माहिती सांगू नका. एखाया व्यवहारात फायदा होऊ शकतो. नवीन माहिती कळेल.

मकर- हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मित्र-मैत्रिणीची चांगली साथ राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत प्रगतीला वाव राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील.

कुंभ - नोकरीत अनपेक्षित बदल होऊ शकतात. नवीन कामाचा ताण राहील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. तब्येतीची काळजी घ्या. मुलांशी चांगला संवाद ठेवा. घरी लगबग राहील. पाहुणे मंडळी येतील. कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मीन- भाग्याची चांगली साथ तुम्हाला
मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. पर्यटनानिमित्त फिरणे होईल. समाजात तुमचा मान वालेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल.

• विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)
 

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 3 june 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app