आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:55 IST2025-10-11T07:48:27+5:302025-10-11T07:55:21+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
मेष - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा
वृषभ - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा
मिथुन - आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल. प्रिय व्यक्तीसह वेळ चांगला जाईल. आणखी वाचा
सिंह - आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा. आणखी वाचा
कन्या - आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. आणखी वाचा
तूळ - आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आपण आनंदी राहाल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल. आणखी वाचा
मकर - आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. आणखी वाचा
कुंभ - आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य - प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. आणखी वाचा