आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2022; अचानक धनलाभ होईल, नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 07:44 IST2022-12-10T07:23:10+5:302022-12-10T07:44:15+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2022; अचानक धनलाभ होईल, नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल
मेष - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा
वृषभ - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. आणखी वाचा
मिथुन - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. आणखी वाचा
कर्क - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल. आणखी वाचा
सिंह - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर जाण्याचा बेत ठरवाल. आणखी वाचा
कन्या - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. मान - सन्मान होतील. वडिलां कडून फायदा संभवतो. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. आणखी वाचा
तूळ - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. चिंतन - मनन यात वेळ घालवाल. त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील. आणखी वाचा
धनु - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. आणखी वाचा
मकर - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. मातृ घराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहावे. आणखी वाचा
कुंभ - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. प्रवासात अडचणी येतील, म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावा. आणखी वाचा
मीन - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. स्थावर संपत्ती, वाहन इत्यादींच्या समस्या निर्माण होऊन आपली चिंता वाढेल. आणखी वाचा