आजचे राशीभविष्य : खर्चाचे प्रमाण वाढेल, रागावर नियंत्रण ठेवा, मानहानी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 07:14 IST2023-10-23T06:59:38+5:302023-10-23T07:14:29+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 23 October 2023 | आजचे राशीभविष्य : खर्चाचे प्रमाण वाढेल, रागावर नियंत्रण ठेवा, मानहानी होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य : खर्चाचे प्रमाण वाढेल, रागावर नियंत्रण ठेवा, मानहानी होण्याची शक्यता

मेष - आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्द्यासंबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल. आणखी वाचा

वृषभ - व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. आणखी वाचा

मिथुन - आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज-मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. भागीदारीत फायदा होईल. आणखी वाचा 

सिंह - आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनखर्च होईल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणे उचित ठरेल. आणखी वाचा

तूळ - आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. कौटुंबिक व जमीन-जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. पाण्यापासून जपून राहा. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा

धनु - आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा

मकर - आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. दांपत्य जीवनात परमानंद लाभेल. घसरणे - पडणे, जखम होणे यांपासून सावध राहा. आणखी वाचा

कुंभ - आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन -
आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र-स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. आणखी वाचा

Open in app

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 23 October 2023