आजचे राशीभविष्य - २८ फेब्रुवारी २०२६: आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आजचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 07:27 IST2026-02-28T07:27:13+5:302026-02-28T07:27:38+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope 28 February 2026: Today is a day for you to get success, fame and benefits | आजचे राशीभविष्य - २८ फेब्रुवारी २०२६: आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आजचा दिवस

आजचे राशीभविष्य - २८ फेब्रुवारी २०२६: आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आजचा दिवस

मेष

28 फेब्रुवारी, 2026 शनिवार च्या दिवशी कर्क राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. (आणखी वाचा)

वृषभ

 आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. (आणखी वाचा)

मिथुन

आज सुरवातीच्या त्रासानंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तेथील वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदात भर पडेल. (आणखी वाचा)

कर्क

आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. (आणखी वाचा)

सिंह

आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो.(आणखी वाचा)

कन्या

आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. (आणखी वाचा)

तूळ

आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. (आणखी वाचा)

वृश्चिक

आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. संततीशी मतभेद संभवतात. (आणखी वाचा)

धनु

आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. (आणखी वाचा)

मकर

आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. ह्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. (आणखी वाचा)

कुंभ

आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. मातुल घरा कडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. (आणखी वाचा)

मीन

 आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. (आणखी वाचा)

Open in app

Web Title : आज का राशिफल - 28 फरवरी, 2026: सफलता का दिन

Web Summary : 28 फरवरी, 2026, मिश्रित भाग्य लेकर आता है। कर्क राशि के जातक संवेदनशील महसूस कर सकते हैं, जबकि वृषभ राशि के लोग प्रियजनों में सांत्वना पा सकते हैं। मिथुन राशि के लोगों के कार्य पूरे होंगे। कन्या राशि के लोग सफलता और लाभ की उम्मीद करते हैं। तुला राशि का वातावरण सकारात्मक रहेगा, लेकिन वृश्चिक राशि के जातकों को चुनौतियों और थकान का सामना करना पड़ सकता है। मकर राशि को वित्तीय लाभ होगा और कुंभ राशि को अच्छी खबर मिलेगी।

Web Title : Daily Horoscope - February 28, 2026: A Day of Success

Web Summary : February 28, 2026, brings mixed fortunes. Cancer natives may feel sensitive, while Taurus can find solace in loved ones. Gemini will see tasks completed. Virgo anticipates success and profits. Libra enjoys a positive atmosphere, but Scorpio may face challenges and fatigue. Capricorn finds financial gains, and Aquarius will receive good news.