आजचे राशीभविष्य, २३ एप्रिल २०२३: जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल, मित्रांसोबत मौजमजा कराल, पण प्रकृतीची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 07:53 IST2023-04-23T07:52:53+5:302023-04-23T07:53:23+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays Horoscope 23 April 2023: You will get full support from your partner, have fun with friends, but take care of your health. | आजचे राशीभविष्य, २३ एप्रिल २०२३: जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल, मित्रांसोबत मौजमजा कराल, पण प्रकृतीची काळजी घ्या

आजचे राशीभविष्य, २३ एप्रिल २०२३: जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल, मित्रांसोबत मौजमजा कराल, पण प्रकृतीची काळजी घ्या

मेष: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे - पिणे टाळणे हितावह राहील. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांचे सहकार्य लाभेल. मनात नकारात्मक विचार येतील. आर्थिक दृष्टया सुद्धा दिवस मध्यम फलदायी आहे.

वृषभ: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊ शकेल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबियांसह वेळ आनंदात जाईल. आत्मविश्वास वाढेल.

मिथुन: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा व व्यवहारात नम्रपणे वागावे लागेल.

कर्क: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखाल. पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

सिंह: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल. जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कन्या: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील. नोकरी - व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. संतती विषयक चिंता राहील. त्यांच्याशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांच्या कारवाया वाढतील.

तूळ: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखाद्या गूढ विषयाकडे आपण आकर्षित व्हाल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल. मान - प्रतिष्ठेत वाढ होईल.

धनु: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

मकर: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. प्राप्त परिस्थिती विचारात घेता प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील.

कुंभ: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रां विषयी सावध राहावे लागेल.

मीन: चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य ह्यामुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पर्यटनस्थळी आयोजित सहलीमुळे मन प्रसन्न राहील. स्वकीयांशी जवळीक वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

Web Title: Todays Horoscope 23 April 2023: You will get full support from your partner, have fun with friends, but take care of your health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app