आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 07:30 IST2025-10-21T07:30:09+5:302025-10-21T07:30:09+5:30
Rashi Bhavishya in Marathi : 21 ऑक्टोबर, 2025 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत आहे.

आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
मेष - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. आणखी वाचा
वृषभ - आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
कर्क - आज हातून एखादे कार्य अविचाराने होईल, तेव्हा काळजी घ्यावी. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. आणखी वाचा
कन्या - आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृश्चिक - आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. आणखी वाचा
धनु - कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा
कुंभ - आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा