आजचे राशीभविष्य १९ सप्टेंबर २०२२; मेष, वृषभसाठी काळजीचा तर सिंह राशीला लाभदायी दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 08:04 IST2022-09-19T08:03:12+5:302022-09-19T08:04:40+5:30
Today's Horoscope 19 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य १९ सप्टेंबर २०२२; मेष, वृषभसाठी काळजीचा तर सिंह राशीला लाभदायी दिवस
मेष - आज आपल्याला नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्याने काही बाबींमध्ये त्रास होईल. नोकरी, व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. आणखी वाचा
वृषभ - आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था आपल्याला महत्त्वाच्या संधीपासून दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तिदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तांचा सहवास यामुळे दिवस खूप आनंदात जाईल. दाम्पत्य जीवनात सुख-समाधान लाभेल. आणखी वाचा
कर्क - आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनस्थिती राहिल्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस लाभदायक ठरेल. मात्र मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरीत पदोन्नती संभवते. मान सन्मान मिळतील. सरकारी कामे होतील. आणखी वाचा
तूळ - व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखन कार्य आणि बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. आणखी वाचा
वृश्चिक - उक्ती आणि कृतीवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे आज हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा
धनु - मेजवानी, सहल, रुचकर भोजन, प्रवास, सुंदर वस्त्रधारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दाम्पत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. आणखी वाचा
मकर - आज व्यापार व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी असल्याने आर्थिक देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. प्रतिस्पर्ध्याला पराभूत कराल. आणखी वाचा
कुंभ - आज चंद्र रास बदलून मिथुन राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज आपण संतती आणि स्वत:चे स्वास्थ याबाबत चिंतीत राहाल. अपचन पोट दुखणे याचा त्रास होईल. आणखी वाचा
मीन - आज शारीरिक आणि मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनांमुळे आपला उत्साह कमी होईल. धन आणि कीर्ती यांची हानी होईल. आणखी वाचा