Rashi Bhavishya :आजचे राशीभविष्य १८ सप्टेंबर २०२२; शुभफलदायी दिवस, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती आनंद यांची प्राप्ती होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 09:06 IST2022-09-18T09:06:12+5:302022-09-18T09:06:59+5:30
Today's Horoscope 18 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Rashi Bhavishya :आजचे राशीभविष्य १८ सप्टेंबर २०२२; शुभफलदायी दिवस, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती आनंद यांची प्राप्ती होईल
मेष - आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस उत्साह आणि प्रसन्नतेचा आहे. प्रकृती चांगली असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. सगे सोयरे किंवा मित्रांकडून उपहार मिळतील. आणखी वाचा
मिथुन - आज आपल्याला बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ खराब असू शकते. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह - आज दृढ आत्मविश्वास आणि मनोलब यामुळे तुम्ही कामात यशस्वी व्हाल. नोकरी, व्यवसाय, व्यापारात तुमच्या बुद्धीमत्तेची चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंददायी बातम्या समजल्याने आपण आनंदीत व्हाल. आणची वाचा
तूळ - आज शक्यतो कुठल्याही नव्या कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य आणि वर्तन यावर नियंत्रण ठेवल्यास गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळता येईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आपण आनंदात आणि उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वत:साठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल आणखी वाचा
मकर - आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाहीत. आज आपणास नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. आणखी वाचा
कुंभ - आज आपण अतिसंवेदनशील झाल्याने आपले मन अस्वस्थ आणि बैचेन होईल. जिद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होती.