Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 07:38 IST2025-09-17T07:37:01+5:302025-09-17T07:38:29+5:30

Today Daily Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल, ठरवलेल्या गोष्टी होतील का? घरातील मतभेद होऊ शकतात का? जाणून घ्या

Today's Horoscope 17 September 2025: There will be gains in the stock market, financial situation will improve; Read what is your horoscope for today? | Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?

Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?

मेष: आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका.  शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सूर्य संक्रांति पासूनचा एक महिन्याचा कालावधी आपल्यासाठी चांगला आहे. प्रेम संबंध सुद्धा दृढ होतील. असे असले तरी सामंजस्याच्या अभावामुळे वाद सुद्धा होऊ शकतात. जीवनात शुभ काळाचे आगमन होईल.
आणखी वाचा

वृषभ:  उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. सूर्याच्या कन्या राशीतील भ्रमणाचा चांगला प्रभाव आपणास पाहावयास मिळू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी समन्वय साधावा. आपसातील सामंजस्याच्या अभावामुळे मतभेद सुद्धा होऊ शकतात. ह्या दरम्यान आपणास जमीन - जुमल्याच्या कामात मदत मिळेल. 
आणखी वाचा

मिथुन: आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. सूर्याचे कन्या राशीतील भ्रमण आपणास अनुकूल असणार आहे. नातेसंबंधांसाठी कालावधी चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. आपणास लहान भावंडांचे सुद्धा सहकार्य मिळेल. वडिलांशी संबंध दृढ होतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी सुद्धा देण्यात येऊ शकते. ह्या दरम्यान आपला व्यापार वृद्धिंगत होईल. शेअर्स बाजार व सट्टा इत्यादीत लाभ होईल. आर्थिक स्थितीत सुद्धा सुधारणा होईल.
आणखी वाचा

कर्क: आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे. सूर्याचे कन्या राशीतील भ्रमण आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. त्याचा प्रभाव आपल्या वैवाहिक नात्यावर सुद्धा होऊ शकतो. ह्या कालावधीत आपण नवनवीन गोष्टी करण्यास उत्साहित राहाल. असे असले तरी आपले काम स्थगित सुद्धा होऊ शकते.
आणखी वाचा

सिंह: आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा मतभेद संभवतात. आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत राहील. प्रत्येक काम यशस्वी होईल. ह्या कालावधीत कोणत्याही प्रकारे कर्ज घेऊ नये. ह्या दरम्यान आपला अडकलेला पैसा सुद्धा आपणास परत मिळू शकतो.
आणखी वाचा

कन्या: व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल. सूर्याचे हे भ्रमण आपल्या राशीतून होत आहे. हे भ्रमण आपल्यासाठी विशेष लाभदायी होईल. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार ह्यांच्याशी मतभेद संभवतात. 
आणखी वाचा

तूळ: आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्‍यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल. सूर्याच्या कन्येतील भ्रमणाचा चांगला प्रभाव आपल्यावर होत असल्याचे दिसेल. असे असले तरी ह्या दरम्यान आपणास सावध राहावे लागेल. ह्या दरम्यान जोडीदाराशी संवाद कमी होईल.
आणखी वाचा

वृश्चिक: आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. नाते संबंधांसाठी हे भ्रमण अनुकूल आहे. आपसातील प्रेम सुद्धा वृद्धिंगत होईल. कारकिर्दीच्या दृष्टीने कालावधी चांगला आहे. एखादी नवीन नोकरी सुद्धा मिळू शकते. व्यापारासाठी सुद्धा दिवस अनुकूल आहेत. ह्या कालावधीत आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होत असल्याचे दिसू शकते.
आणखी वाचा

धनु: आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. ह्या दरम्यान आपले नातेसंबंध चांगले राहतील. दांपत्य जीवनात माधुर्य येईल. नोकरी व व्यवसायात लाभ होईल. नवीन नोकरीची संधी सुद्धा मिळू शकते. आपली पदोन्नती सुद्धा संभवते. 
आणखी वाचा

मकर: आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास व एखादा प्रवास आपल्या आनंदात भर घालू शकेल. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपल्यासाठी विशेष चांगले नाही. ह्या दरम्यान आपणास थोडे सावध राहावे लागेल. दांपत्य जीवनात जोडीदाराशी वाद सुद्धा होऊ शकतो. कौटुंबिक वाद सुद्धा संभवतात.
आणखी वाचा

कुंभ: आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. सूर्याचे हे गोचर भ्रमण आपल्यासाठी काही विशेष असे चांगले नाही.  दरम्यान आपणास सरकार तर्फे सुद्धा लाभ होऊ शकतो. ह्या कालावधीत आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात.  
आणखी वाचा

मीन: आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. सूर्याचे कन्या राशीतील गोचर भ्रमण आपल्यासाठी त्रासदायी होऊ शकते. व्यावसायिक भागीदाराशी संबंधात काही तणाव असल्याचे सुद्धा दिसू शकते. निष्काळजीपणामुळे व्यापारात नुकसान होऊ शकते. 
आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 17 September 2025: There will be gains in the stock market, financial situation will improve; Read what is your horoscope for today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app