आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 07:20 IST2025-12-13T07:19:46+5:302025-12-13T07:20:18+5:30

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य

Today's Horoscope, 13 December 2025: Today is a day of financial gain for Scorpio zodiac sign; Success, fame will increase | आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल

आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल

मेष- आज चंद्र रास बदलून 13 डिसेंबर, 2025 शनिवार च्या दिवशी कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. आज शारीरिक व मानसिक उत्साह अनुभवाल. मित्र व स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्यासह एखाद्या समारंभास किंवा सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा 

वृषभ-  आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरीही आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. आणखी वाचा

मिथुन- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थां पासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन ह्या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा. आणखी वाचा

कर्क- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा

सिंह- आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही ह्यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल.  आणखी वाचा

कन्या- आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आणखी वाचा

तूळ- आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. आणखी वाचा

वृश्चिक- आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्या कडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा

धनु- आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापारासाठी प्रवास होऊ शकतो. आणखी वाचा

मकर- आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. आणखी वाचा

कुंभ- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. आणखी वाचा

मीन- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल, 13 दिसंबर 2025: आर्थिक लाभ और यश का दिन।

Web Summary : 13 दिसंबर, 2025 का राशिफल: मेष राशि को आर्थिक लाभ। वृषभ वाणी से प्रभाव डालेगा। मिथुन मानसिक अशांति का सामना करेगा। कर्क को सफलता मिलेगी। सिंह खुशी से खर्च करेगा। कन्या समृद्धि का अनुभव करेगी। तुला संघर्ष से बचे। वृश्चिक को करियर में लाभ। धनु को पहचान मिलेगी। मकर को व्यावसायिक बाधाएं। कुंभ सावधानी बरते। मीन अवकाश का आनंद लें।

Web Title : Daily Horoscope, December 13, 2025: Auspicious day for finances, fame.

Web Summary : December 13, 2025, forecasts varied fortunes. Aries benefits financially. Taurus gains influence through speech. Gemini faces mental unrest. Cancer enjoys success. Leo spends happily. Virgo experiences prosperity. Libra avoids conflict. Scorpio sees career gains. Sagittarius achieves recognition. Capricorn faces business hurdles. Aquarius exercises caution. Pisces enjoys leisure.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.