आजचे राशीभविष्य- ०५ एप्रिल २०२३: जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल; काहीही झाले तरी संयम सोडू नका, मुलांची काळजी घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 07:29 IST2023-04-05T07:15:09+5:302023-04-05T07:29:12+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - 05 April 2023: There will be gains in land transactions; No matter what happens, don't lose patience, take care of the children... | आजचे राशीभविष्य- ०५ एप्रिल २०२३: जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल; काहीही झाले तरी संयम सोडू नका, मुलांची काळजी घ्या...

आजचे राशीभविष्य- ०५ एप्रिल २०२३: जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल; काहीही झाले तरी संयम सोडू नका, मुलांची काळजी घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १५, १९४५. तिथी चैत्र शुक्ल चतुर्दशी H (सकाळी ९.१९ पर्यंत) शालिवाहन शके १९४५, शोभन नाम संवत्सर, नक्षत्र : सकाळी ११:२३ पर्यंत उत्तरा त्यानंतर हस्त रास कन्या, आज : सामान्य दिवस. हनुमान जयंतीचा उपवास राहूकाळ : दुपारी १२ ते १:३० (राहूकाळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- फार दगदग होईल अशी कामे करू नका. कामातून वेळ काढून आराम करा. तब्येतीची काळजी घ्या. आपल्या योजना इतरांना सांगत बसू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. अनावश्यक खर्चाला आवर घाला. काहीही झाले तरी संयम सोडू नका.

वृषभ- स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. चांगल्या बातम्या कळतील. मुलांची प्रगती होईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. सरकारी कार्यालयातील कामे गती घेतील. आर्थिक आवक चांगली राहील. मन आनंदी राहील.

मिथुन- नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. कामाचे स्वरूप बदलू शकते. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मात्र सतत धडपड सुरू राहील. घरी पाहुणे येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

कर्क- व्यवसायात भरभराट होईल. सतत कामे करीत राहाल. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या बोलण्याला मान राहील. मुलांची काळजी घ्या. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.

सिंह- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामांत सफलता मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा.

कन्या- मनात आनंदी विचार राहतील. अडचणी दूर झाल्यामुळे व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल. लोक तुमची प्रशंसा करतील. लोकाचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

तूळ- कामानिमित्त बाहेरगावी जावे लागेल. महत्त्वाच्या कामात विलंब होईल. काही अडचणी येतील. मनात काळजीचे विचार राहतील. लोकांबद्दल तुमच्या मनात शंका राहतील, अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे, जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

वश्चिक- ग्रहमानाची साथ मिळेल. आपल्या योजना गती घेतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. सहकारी, मित्र-मैत्रिणी यांची चांगली साथ राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. भेटवस्तू मिळतील, भाग्याची चांगली साथ राहील.

धनु- नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. त्यामुळे चांगली संधी मिळेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. मुलांची प्रगती होईल. व्यवसायात चांगली स्थिती राहील.

मकर- भाग्याची चांगली साथ तुम्हाला राहील. अडचणी दूर झाल्यामुळे मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल, सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. काहींना जवळच्या प्रवासाचा योग येईल.

कुंभ- आर्थिक प्राप्त प्रमाण चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. व्यवसायात फायदा होईल. मात्र सतत कार्यरत राहावे लागेल. प्रवास शक्यतो टाळा.

मीन- नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मात्र कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. किरकोळ कारणावरुन वाद टाळा. भेटवस्तू मिळतील. तरुण वर्गाला प्रेमात सवलत मिळेल.

Web Title: Today's Horoscope - 05 April 2023: There will be gains in land transactions; No matter what happens, don't lose patience, take care of the children...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app