Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 07:50 IST2022-05-29T07:48:01+5:302022-05-29T07:50:37+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays daily horoscope may 29 2022 know what your rashi says rashi bhavishya | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस

मेष: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. अधिक वाचा

वृषभ: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. मित्रांकडून लाभ होईल. नवीन परिचयामुळे मन आनंदित होईल. अचानक धनलाभ संभवतो. अधिक वाचा

मिथुन: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

कर्क: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. अधिक वाचा

सिंह: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. अधिक वाचा

कन्या: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. अधिक वाचा

तूळ: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपारनंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. अधिक वाचा

वृश्चिक: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. अधिक वाचा

धनु: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी काही तरतूद कराल. अधिक वाचा

मकर: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत. अधिक वाचा

कुंभ: चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील. अधिक वाचा

मीन:  चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. अधिक वाचा

Web Title: todays daily horoscope may 29 2022 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app