Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ जून २०२२: नशिबाची साथ लाभेल; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 07:08 IST2022-06-04T07:07:19+5:302022-06-04T07:08:10+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays daily horoscope june 04 2022 know what your rashi says rashi bhavishya | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ जून २०२२: नशिबाची साथ लाभेल; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभाचा दिवस

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ जून २०२२: नशिबाची साथ लाभेल; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभाचा दिवस

मेष: आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. आज महत्वाचा व्यवहार करू नका. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. अधिक वाचा

वृषभ: आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. अधिक वाचा

मिथुन: आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. अधिक वाचा

कर्क: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आपले मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे. अधिक वाचा

सिंह: आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या. वाणी व व्यवहार ह्यात संयम व विवेक राखावा. अधिक वाचा

कन्या: आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. अधिक वाचा

तूळ: आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्‍यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल. अधिक वाचा

वृश्चिक:  आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. प्रतिस्पर्धी व विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका. अधिक वाचा

धनु: आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण - तंट्या पासून दूर राहा. अधिक वाचा

मकर: आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. अधिक वाचा

कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. अधिक वाचा

मीन: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील. मानसिक संतुलन व बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. अधिक वाचा

 

Web Title: todays daily horoscope june 04 2022 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app