Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ जून २०२२: ‘या’ ६ राशींना मिळतील विविध संधी; यश, प्रगतीचा प्रेरणादायी दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 07:38 IST2022-06-02T07:38:08+5:302022-06-02T07:38:37+5:30
Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ जून २०२२: ‘या’ ६ राशींना मिळतील विविध संधी; यश, प्रगतीचा प्रेरणादायी दिवस
मेष: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल. आज नोकरी - व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील. अधिक वाचा
वृषभ: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत एखादे नवीन काम सुरू करणे हितावह ठरू शकणार नाही. अधिक वाचा
मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्ति कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. अधिक वाचा
कर्क: आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत. एखादी समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा अपघात संभवतो. कोणतेही कृत्य विचार पूर्वकच करावे. अधिक वाचा
सिंह: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल व त्यांच्या कडून काही लाभ सुद्धा पदरी पडेल. मित्रांसह सहलीचा बेत आखाल. अधिक वाचा
कन्या: आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात. घरात आनंदी वातावरण राहील. अधिक वाचा
तूळ: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. परदेशस्थ मित्रांकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. अधिक वाचा
वृश्चिक: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे. नवे संबंध विचार पूर्वक जोडा. खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिक वाचा
धनु: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमालाप करू शकाल. लेखन कार्यास आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक विचारांची देवाण घेवाण होईल. भागीदारीत फायदा होईल. अधिक वाचा
मकर: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेले बरे. अधिक वाचा
कुंभ: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. अधिक वाचा
मीन: आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. कोर्ट - कचेरीची कागदपत्रे सावधानतेने करा, एखाद्या वेळेस मानहानीला ते कारण होईल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. अधिक वाचा