Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २८ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना सुखशांती व आनंददायी दिवस; नोकरीत उत्तम लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 07:19 IST2022-07-28T07:18:34+5:302022-07-28T07:19:28+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays daily horoscope july 28 2022 know what your rashi says rashi bhavishya | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २८ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना सुखशांती व आनंददायी दिवस; नोकरीत उत्तम लाभ

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २८ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना सुखशांती व आनंददायी दिवस; नोकरीत उत्तम लाभ

मेष: आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. अधिक वाचा

वृषभ: आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत ह्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आज आपल्या वाक्चातुर्याने आपण यशस्वी व्हाल व त्याचा इतरांवर सुद्धा प्रभाव होईल. अधिक वाचा

मिथुन: आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळ पासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. मित्र व नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल. आज आपण सर्वांसह एखादा आनंददायक प्रवास ठरवण्याची सुद्धा शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुसंवाद राहील. अधिक वाचा

कर्क: आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद ह्यापासून शक्यतो दूर राहावे. अधिक वाचा

सिंह: आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभा पासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडे लक्ष द्यावे. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिक वाचा

कन्या: सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. अधिक वाचा

तूळ: आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती व स्वास्थ्य ह्या संबंधी चिंता लागून राहील. नोकरीत वरिष्ठ किंवा सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी शक्यतो कोणतीही चर्चा करू नका. अधिक वाचा

वृश्चिक: आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अवैध काम किंवा सरकारी काम ह्या पासून दूर राहा, नाहीतर अडचणीत याल. अधिक वाचा

धनु: आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील.भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल. त्यांच्याशी रोमांचक भेट होईल. विचारात स्थैर्य राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान होतील. अधिक वाचा

मकर: आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आर्थिक देवाण - घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. देश- परदेशात व्यवसाय असणार्याना फायदा होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. धनलाभ संभवतो. कामात यशस्वी व्हाल. अधिक वाचा

कुंभ: आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. शक्यतो आज प्रवास टाळावेत. संतती संबंधी प्रश्न भेडसावतील. आज नवीन काम सुरू न करणे हितावह राहील. अधिक वाचा

मीन: आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे. उत्साह व स्फूर्तीचा अभाव जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावेत. अधिक वाचा

 

Web Title: todays daily horoscope july 28 2022 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app