Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२२: ‘या’ ९ राशींना अनुकूल; नोकरी, व्यापारात लाभाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 07:04 IST2022-07-27T07:02:56+5:302022-07-27T07:04:26+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२२: ‘या’ ९ राशींना अनुकूल; नोकरी, व्यापारात लाभाचा दिवस
मेष: आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत आपण सहभागी होऊ नये. आज छोटासा प्रवास संभवतो. आज स्त्रीयांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. अधिक वाचा
वृषभ: आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भावंडांकडून प्रेम व सहकार्य मिळेल. कलावंत, कारागीर, व लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल. अधिक वाचा
मिथुन: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आपणास प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन व चांगले कपडे घालावयास मिळतील. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक फायदा होईल. अधिक वाचा
कर्क: आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्याने आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. गैरसमज व मानहानी संभवते. अधिक वाचा
सिंह: आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठया भावंडांचा सहवास मिळेल. एखादा मंगल प्रसंग असू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. पत्नीचे सहकार्य लाभेल. अधिक वाचा
कन्या: आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. पितृघराण्या कडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. अधिक वाचा
तूळ: आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरे ह्यांची खुशाली समजल्याने आपण आनंदात राहाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीची चिंता लागून राहील. अधिक वाचा
वृश्चिक: सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. खाण्या- पिण्या विषयी काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक बेचैनी जाणवेल. अधिक वाचा
धनु: आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. स्वादिष्ट भोजन व सुंदर वस्त्र लाभल्याने मन प्रसन्न राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. भिन्नलिंगी वक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाऊ शकेल. अधिक वाचा
मकर: व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुख - शांतीचे वातावरण राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य सुद्धा मिळवू शकाल. अधिक वाचा
कुंभ: आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील. अपचन व अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते. अधिक वाचा
मीन: आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. नोकरीत काळजीचे वातावरण राहील. पैसा व कीर्ती ह्यांची हानी संभवते. अधिक वाचा