Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 07:37 IST2022-07-26T07:35:49+5:302022-07-26T07:37:04+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस
मेष: दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरवात करू नये. दुपार नंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल. अधिक वाचा
वृषभ: आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्याने आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. अधिक वाचा
मिथुन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा
कर्क: आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. अधिक वाचा
सिंह: आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्राप्तीत वाढ होईल. अधिक वाचा
कन्या: आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल. अधिक वाचा
तूळ: आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपार नंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल. अधिक वाचा
वृश्चिक: आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात अडचणी येतील. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती ह्यामुळे आपणास मदत होईल. अधिक वाचा
धनु: आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. अधिक वाचा
मकर: आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपार नंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एखादा आर्थिक लाभ संभवतो. अधिक वाचा
कुंभ: विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा. लेखन- वाचन यांत गोडी वाढेल. अधिक वाचा
मीन: आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. अधिक वाचा