Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 07:44 IST2025-05-11T07:42:51+5:302025-05-11T07:44:59+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
मेष
आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. आणखी वाचा
वृषभ
आ आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. आणखी वाचा
मिथुन
आज चंद्र रास बदलून 11 मे, 2025 रविवारी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. आणखी वाचा
कर्क
आज चंद्र रास बदलून 11 मे, 2025 रविवारी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. आणखी वाचा
सिंह
आज चंद्र रास बदलून 11 मे, 2025 रविवारी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. आणखी वाचा
कन्या
आज चंद्र रास बदलून 11 मे, 2025 रविवारी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आणखी वाचा
तूळ
आज चंद्र रास बदलून 11 मे, 2025 रविवारी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक
आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या स्वभावातील तामसवृत्ती व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. आणखी वाचा
धनु
आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. आणखी वाचा
मकर
आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. कुटुंब व संतती यांच्याविषयी आपणाला आनंद व समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल व ते फायदेशीर ठरेल. आणखी वाचा
कुंभ
आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आणखी वाचा
मीन
आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल. आणखी वाचा