Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 07:45 IST2025-07-04T07:43:03+5:302025-07-04T07:45:10+5:30

Today Horoscope in Marathi : कोणत्या राशीच्या लोकांना कामात येणार अडथळा, कुणाच्या कुटुंबात होऊ शकतो कलह, जाणून घ्या काय सांगतेय तुमची राशी...

Today Daily Horoscope in marathi Which zodiac sign will have financial gains today? Know your horoscope | Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

मेष : आयात - निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल.
आणखी वाचा

वृषभ : ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आजारापासून सुटका होईल.
आणखी वाचा

मिथुन : आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल.
आणखी वाचा

कर्क : मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल.  
आणखी वाचा

सिंह : आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण खुश व्हाल.
आणखी वाचा

कन्या : गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांनाआजचा दिवस अनुकूल आहे. हौस - मौज ह्यावर खर्च होईल.
आणखी वाचा

तूळ : आपली कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र व कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहन सुख मिळेल.
आणखी वाचा

वृश्चिक : आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल.
आणखी वाचा

धनु : आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील.
आणखी वाचा

मकर : आज व्यापार - व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते. पित्याकडून लाभ होईल. 
आणखी वाचा

कुंभ : शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. मौज - मस्ती हिंडण्या - फिरण्यावर खर्च होईल. दूरचे प्रवास घडतील.
आणखी वाचा

मीन : आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. इतर कामकाजात सुद्धा प्रतिकूलता जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल.
आणखी वाचा 

Web Title: Today Daily Horoscope in marathi Which zodiac sign will have financial gains today? Know your horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app