आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 06:54 IST2025-10-27T06:42:24+5:302025-10-27T06:54:32+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 27 october 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस

आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस

Today Daily Horoscope 

मेष:  आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी-व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील. आणखी वाचा 

वृषभ: आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात विघ्ने येतील. नोकरी-व्यवसायाच्या जागी कामाचा व्याप वाढल्यामुळे थकून जाल. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

मिथुन: आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागिने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल व लोकप्रियता वाढेल. व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल. दांपत्यसुखाची प्राप्ती होईल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा 

सिंह: आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल. गूढ व रहस्यमय विद्येकडे कल होईल. आणखी वाचा 

कन्या:  आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. आणखी वाचा 

तूळ: नवीन कामाची सुरुवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामानिमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आज शारीरिक व मानसिक स्वस्थता अनुभवू शकाल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उद्भवू नयेत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य आपणास बेचैन करेल. आणखी वाचा 

धनु: आज संततीचे सुख व स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. एखादे मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग व मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जोडीदाराकडून सुख-समाधान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सुग्रास भोजनाची प्राप्ती होईल. आणखी वाचा 

मकर:  आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. सांभाळून पावले उचला. सामाजिक उपक्रमांत भाग घ्याल. परोपकारी कार्यावर पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

कुंभ:  आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. मित्र प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी व संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा 

मीन: आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान किंवा उच्चपद मिळेल. आणखी वाचा 

 

Open in app

Web Title : आज का राशिफल, 27 अक्टूबर 2025: धन लाभ, सफलता और खुशी

Web Summary : मिथुन राशि वालों के लिए खुशी और लाभ का दिन। कर्क राशि वाले खुशी और सफलता पाएंगे। तुला राशि वाले नए काम शुरू कर सकते हैं। धनु राशि वाले पारिवारिक आनंद और वित्तीय लाभ का आनंद लेंगे। हालांकि, वृषभ राशि वालों को देरी होगी और कन्या राशि वालों को चुनौतियों का सामना करना पड़ेगा। आशावाद और व्यावहारिक विचारों को संतुलित करें।

Web Title : October 27, 2025 Horoscope: Financial Gains, Success, and a Happy Day

Web Summary : Auspicious day for Gemini with joy and gains. Cancer finds happiness and success. Libra can start new ventures. Sagittarius enjoys family bliss and financial benefits. However, Taurus faces delays, and Virgo experiences challenges. Proceed cautiously, balancing optimism with practical considerations for a fulfilling day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.