Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना धनप्राप्ती योग, शुभ फलदायी; यशकारक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 07:07 IST2023-03-26T07:07:07+5:302023-03-26T07:07:07+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 26 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना धनप्राप्ती योग, शुभ फलदायी; यशकारक दिवस

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना धनप्राप्ती योग, शुभ फलदायी; यशकारक दिवस

मेष: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. धन प्राप्ती संभवते. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने घरातील वातावरण कलुषित होईल. कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. त्यामुळे आर्थिक चिंता निर्माण होईल. पूर्ण विचार केल्या शिवाय कोणताही निर्णय आज घेऊ नये. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संततीकडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. स्त्री मित्रांकडून लाभ संभवतो. प्रवास आनंददायी होतील. स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा 

कर्क: नोकरी - व्यवसाय करण्याऱ्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. धन-मान-सन्मान मिळतील. घर सजावटीत आपण रस घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकारकडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. परदेशात राहणार्‍या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. नोकरी - व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस व विमनस्कता जाणवेल. आणखी वाचा 

कन्या: आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने मन उदास होईल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ व रहस्यमय गोष्टीत रूची राहील. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस यशस्वितेचा व आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. मौजमजेसाठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. व त्यांच्या वापरासाठी संधी सुद्धा मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. आणखी वाचा 

वृश्चिक: आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. आजारी व्यक्तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्‍या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रिय व्यक्तीसह सुखद क्षणांचा अनुभव घेता येईल. साहित्य व लेखन क्षेत्रात रस राहील. वाद - विवाद व बौद्धिक चर्चा ह्यापासून दूर राहणे हिताचे होईल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. एखादी धनहानी व मानहानी संभवते. आणखी वाचा 

कुंभ: चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल. आणखी वाचा 

मीन: वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: today daily horoscope 26 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app