आजचे राशीभविष्य, २५ जून २०२३: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अनुकूल दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 07:18 IST2023-06-25T07:15:41+5:302023-06-25T07:18:38+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 25 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य, २५ जून २०२३: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अनुकूल दिवस

आजचे राशीभविष्य, २५ जून २०२३: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अनुकूल दिवस

मेष: साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा 

वृषभ: आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस सुखा-समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपारनंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. अधिक हळवे व्हाल. घरातील वातावरण प्रतिकूल राहील. जमीन वा इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपारनंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. सहकार्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. प्रकृती उत्तम राहील. मनाच्या प्रसन्नतेमुळे दिवसाचा आनंद वाढेल. आणखी वाचा 

सिंह: आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वकीय व मित्र यांच्याशी खूप कालावधी नंतर होणारा एखादा व्यवहार आनंददायी व लाभदायी ठरेल. आणखी वाचा 

कन्या: भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. दुपारनंतर वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनातील चिंता कमी होईल व मन आनंदी बनेल. आणखी वाचा 

तूळ: आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. दुपारनंतर मात्र हळुवारपणा वाढल्याने मन व्यग्र बनेल. काळजीमुळे मनस्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. उक्ती आणि कृती यांत संयम बाळगा. खर्च वाढेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल. दिवसभर वैचारिक पातळीवर अनिश्चिततेचे मळभ राहील. आणखी वाचा 

धनु: आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी अनुकूल आहे. लाभ होईल. आणखी वाचा 

मकर: आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका. निरर्थक वाद-विवाद व चर्चा यापासून दूर राहा. आणखी वाचा 

कुंभ: आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतो. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही. आणखी वाचा 

मीन: आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळणे अवघड होईल. आणखी वाचा 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Open in app

Web Title: today daily horoscope 25 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi