आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 07:12 IST2023-05-24T07:11:59+5:302023-05-24T07:12:31+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope 24 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल

आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल

मेष 

घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने पाव्हण्यारावळ्यांची वर्दळ राहील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल. आर्थिक बाजू बळकट राहील.

वृषभ

व्यवसायात भरभराट होईल. सतत कार्यरत राहाल. मोठी गुंतवणूक केली जाईल, भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्याची प्रगती कळेल. जवळच्या लोकांच्या समवेत सहलीला जाण्याचे योग येईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. त्याचवेळी खर्च पण कराल.

मिथुन

कामात सफलता मिळेल. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आवडल्या भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क

तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. जीवनसाथीशी सूर जुळतील तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूना अनुकूल काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल.

सिंह

आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विविध प्रकारच्या भेटवस्तू व सुखसोयी मिळतील. चैन व मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरेल. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. भावंडांसाठी वेळ द्यावा लागेल.

कन्या

अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सोप्या पद्धतीने यश मिळेल. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील.

तूळ 

तुमच्या मनावरील होईल. काही गैरसमज दूर होतील. पर्यटनाच्या संधी मिळतील. मुलांची प्रगती होईल. नोकरीत मोठी संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. घरी पाहुणे मंडळी येतील. व्यवसायात भरभराट होईल.

वृश्चिक

तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. आत्मविश्वासाने कामे कराल, मौजमजा करण्यासाठी पैसा व वेळ खर्च कराल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. समाजात तुमचा गौरव होईल. मुलाची प्रगती होईल.

धनू 

महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ नयेत म्हणून थोडी काळजी घ्या. कामांचे नीट नियोजन करा. खूप घाईघाईत कामे करू नका. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वाहने जपून चालवा.

मकर

व्यवसायात भरभराट होईल. पैशाचा ओघ सुरू राहील. मात्र, आर्थिक व्यवहार जपून करा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. विवाहेच्छूना अनुकूल काळ आहे. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. मनात आनंदी विचार राहतील.

कुंभ

 कामात अडचणी येतील. थोड़ा संयम बाळगण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.

मीन

ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. चांगल्या बातम्या कळतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. धनलाभ होईल. 

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)
 

Web Title: Today Daily Horoscope 24 may 2023 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app