Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ ऑक्टोबर २०२२: धनत्रयोदशीला अचानक धनलाभाचे योग; शुभ फलदायी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 07:33 IST2022-10-22T07:23:40+5:302022-10-22T07:33:45+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 22 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ ऑक्टोबर २०२२: धनत्रयोदशीला अचानक धनलाभाचे योग; शुभ फलदायी दिवस

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ ऑक्टोबर २०२२: धनत्रयोदशीला अचानक धनलाभाचे योग; शुभ फलदायी दिवस

मेष: आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून सुद्धा कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. प्रवासात अडथळे येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आज आपण प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास व खंबीर मनोबलासह करून त्यात यश मिळवाल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकतील. कला व क्रीडा क्षेत्रांत कलाकारांना आपले कसब दाखविण्याची संधी मिळेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस नवीन योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. शेजारी - पाजारी, भावंडे तथा मित्रमंडळ यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. नशीबाची साथ मिळेल. जवळपासचे प्रवास घडतील. आणखी वाचा 

कर्क: आज गैरसमज व नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल. अवैध प्रवृत्तीकडे झुकणार्‍या मनाला काबूत ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना विद्यार्जनात अपेक्षित सफलता मिळणार नाही. आणखी वाचा 

सिंह: आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप व वागण्यात तापटपणा राहील. त्यावर नियंत्रण ठेवावे. डोकेदुखी व पोटाचे आजार बळावतील. दांपत्य जीवनात माधुर्य राहील. आणखी वाचा 

कन्या: आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांशी पटणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. मांगलिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. कोर्ट - कचेरी व नोकरांपासून जपून राहावे लागेल. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभफलदायी व लाभदायी आहे. मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पत्नी व संतती यांच्याकडून सुखा - समाधानाचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. दांपत्य जीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संततीची प्रगती झाल्याने आपले समाधान होईल. आणखी वाचा 

धनु: आज आपणाला प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी - व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. कामात फार कमी प्रमाणात यश मिळेल. उच्च अधिकारी व विरोधक यांच्याशी वादविवादात पडू नये. आणखी वाचा 

मकर: आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळे अनेक संकटांपासून वाचाल. आहारावर विशष लक्ष न दिल्यास प्रकृती बिघडेल. व्यवस्थापन कार्यात आपले नैपुण्य दाखवाल. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा 

कुंभ: आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन व नवी वस्त्रे ह्यामुळे मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावळा बनेल. बोलण्यात मर्यादा व वर्तनात नम्रता ठेवावी. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. सहकारी व नोकरांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: today daily horoscope 22 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app