आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 06:59 IST2025-05-22T06:47:11+5:302025-05-22T06:59:12+5:30
Today Daily Horoscope 22 May 2025: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
मेष: आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता होणार नाही. स्वकीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल. आणखी वाचा
वृषभ: आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार - व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचे कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. दुपारनंतर नवीन कामाचे यशस्वी नियोजन करू शकाल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपारनंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल. वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य तडीला जाईल. नोकरीत बढती संभवते. धन मिळेल. आणखी वाचा
कर्क: आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपारनंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याशी वाद व मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह: आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल. पैशाची चणचण भासेल. आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपारनंतर दिवस आनंदात जाईल. व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील. आणखी वाचा
तूळ: आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आज यश व कीर्ती प्राप्त होईल. व्यवसायात चांगले सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल. दुपारनंतर वैचारिक स्थैर्य राहणार नाही. आज नवीन कार्य हाती घेणे हितावह राहणार नाही. आणखी वाचा
धनु: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्टया आपण बेचैन राहाल. सौंदर्य प्रासधने, गृहसजावट व मनोरंजनाची साधने खरेदी करू शकाल. स्थावर मालमत्ते विषयक कागद पत्रांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
मकर: आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल. एखादा प्रवास संभवतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा
कुंभ: आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उद्भवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कुटुंबीयांकडून सुख मिळेल. आणखी वाचा