आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 07:28 IST2023-05-22T07:27:10+5:302023-05-22T07:28:05+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope 22 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा

आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा

मेष

मनोरंजन व मौजमजा करण्यासाठी वेळ काढता येईल. भावडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत थोडा तणाव राहील. गोडीत वागून आपली कामे करून घ्या. धनलाभ होईल.

वृषभ

धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात फायदा होईल. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अनावश्यक उठाठेव करण्याच्या नादात वेळ दवडू नका.

मिथुन

मनासारख्या घटना घडतील. मनात आनंदी विचार राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक राहील. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. नवीन कल्पना विकसित होतील.

कर्क

नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठाकडून चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र मिळकतीच्या तुलनेत अधिक खर्च कराल, मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च होईल. काहीना दूरच्या प्रवासाचा योग येईल.

सिंह

ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल, लोकांच्या भेटीगाठी होतील. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. प्रगतीला पूरक वातावरण राहील. भेटवस्तू मिळतील. आत्मविश्वासाने कामे कराल.

कन्या

नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. कामाचा ताण कमी राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. वाहनसुख मिळेल. इतर सुविधा मिळतील. एखादी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. धाडसी पावले टाकाल.

तूळ 

तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.  मनासारख्या घटना घडतील. अडचणी दूर होतील. पर्यटनाचा आनंद लुटता येईल. समाजात तुमचा गौरव होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. जीवनसाथीशी सूर जुळतील. मुलांचे कौतुक होईल. आवडते छंद जोपासा.

वृश्चिक

महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. जीवनसाथीची काळजी घ्या. प्रवासात सतर्क राहा. काहींना अचानक धनलाभ होईल. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. नोकरीत चांगली स्थिती राहील. तुमचा प्रभाव पडेल.

धनु

मनात आनंदी विचार राहतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नवीन कल्पना विकसित केल्या जातील. काहींना भेटवस्तू मिळतील. खर्च वाढतील.

मकर

आरोग्याची काळजी घ्या. फार उन्हात फिरू नका. महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. देवाण घेवाणीचे व्यवहार करताना खबरदारी घ्या. कुणाच्या बोलण्याला फसू नका. जीवनसाथीची काळजी घ्या.

कुंभ 

अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मुलांना चांगल्या संधी मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. समाजात तुमचा मान वाढेल. भेटीगाठी फायदेशीर ठरतील. मौजमजा करण्यासाठी प्रवास होतील.

मीन 

मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. चांगल्या घटना घडतील. घरात आनंदी वातावरण राहील. पाहुणे मंडळी येतील. घराची शोभा वाढविणाच्या वस्तूंची खरेदी कराल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. 

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद )
 

Web Title: Today Daily Horoscope 22 may 2023 know what your rashi says rashi bhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app