आजचे राशीभविष्य - 20 मे 2023;'या' राशीतील लोकांना वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 07:33 IST2023-05-20T07:07:19+5:302023-05-20T07:33:51+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 20 मे 2023;'या' राशीतील लोकांना वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल
मेष- आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. भाग्याची चांगली साथ राहील. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल; मात्र त्यात काही कटकटी होऊ शकतात. तुमच्या यशाच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा.
वृषभ- आपल्या अडचणी दूर होतील; मात्र मनासारखे अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे यश मिळूनही मनात काळजीचे विचार राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. व्यवसायात धाडसी पावले टाकाल. मनासारखे भोजन मिळेल.
मिथुन- हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पात अडचणी येतील. कामाचा ताण राहील. दगदग होईल अशी कामे करू नका. प्रवासात सतर्क राहा. महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू सांभाळा. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. अनावश्यक खर्चाला आवर घाला.
कर्क- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. कामे होतील; पण त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतील. खरेदीच्या निमित्ताने बराच पैसा खर्च होईल. घरासाठी महागड्या वस्तू खरेदी कराल. जीवनसाथीशी वाद टाळा.
सिंह- कार्यक्षेत्रात वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. लोकाशी सुसंवाद साधला पाहिजे. मुत्सद्दीपणाने वागा. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल.
कन्या- तुमच्या अनेक अडचणी कमी होतील. अनेकांची मदत मिळेल. त्यामुळे आपली वाटचाल सोपी होईल. काहींना प्रवास घडून येईल. प्रवासात वस्तूंची काळजी घ्या. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक आवक चांगली राहील.
तूळ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. काही लोकांच्या बाबतीत आपला भ्रमनिरास होईल. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल; मात्र लोकांचे खरे स्वरूप उघडकीस आल्यामुळे संभाव्य नुकसान टळेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होईल.
वृश्चिक-मनात काही नवीन कल्पना विकसित होतील. आत्मविश्वासाने कामे कराल. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत तुमचे पारडे जड राहील; मात्र कामाचा ताण राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.
धनू- विरोधकांच्या कारवाया वाढतील. सावधपणे पावले उचलली पाहिजेत. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या भावना समजून घ्या. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. भावंडांची चांगली साथ राहील.
मकर- कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. बोलून वाईट होऊ नका. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. मुलांची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधा.
कुंभ- घरी अचानक पाहुणे मंडळी येतील. त्यामुळे तुमची तारांबळ उडेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. काही बदल होतील. सतत कार्यरत राहावे लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्याच्याशी संवाद राहील. मुलांना यश मिळेल.
मीन- विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. भाग्याची चांगली साथ राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. वस्तू खरेदी कराल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या प्रवासाचा योग येईल.
-विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)