आजचे राशीभविष्य - 18 मे 2023; 'या' राशीतील लोकांना धनप्राप्ती होईल, तर यांच्या नोकरीत 'बदलीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 07:06 IST2023-05-18T07:02:57+5:302023-05-18T07:06:14+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 18 मे 2023; 'या' राशीतील लोकांना धनप्राप्ती होईल, तर यांच्या नोकरीत 'बदलीची शक्यता
मेष- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. हाती घेतलेल्या कामात काही अडचणी राहणार नाहीत. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. जीवनसाथीच्या कलाने वागण्याची गरज आहे. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. अनावश्यक खर्च टाळा.
वृषभ- महत्त्वाची कामे थोडी पुढे ढकलली तर बरे राहील. त्यामुळे अनावश्यक खर्च कमी होईल. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. आवडते पदार्थ व फळे खाण्यास मिळतील. कामाचे दडपण घेऊ नका. मनात सकारात्मक विचार ठेवा. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.
मिथुन- धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे फार मोठे सौदे करताना खबरदारी घेतली पाहिजे. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. वारसाहक्काने मिळणाच्या उत्पन्नाचा लाभ होईल. सही करताना कागदपत्रे वाचून घ्या.
कर्क- नोकरीत 'बदलीची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना काम मिळेल. नातेवाईक जवळच्या लोकाच्या भेटीगाठी होतील. घरात लगबग राहील. सरकारी कामे मार्गी लागतील. दगदग होईल, अशी कामे करणे टाळा. सकारात्मक विचार करा.
सिंह- हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. नशिबाचा कॉल तुमच्या बाजूने राहील. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. चोरी. नुकसानीची शक्यता आहे. तुमच्या संयमाची परीक्षा पाहिली जाईल. थोडे सबुरीने वागा.
कन्या- महत्त्वाची. कामे थोड़ी पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा जास्त प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होईल. प्रवासात दगदग होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शांत चित्ताने वाहन चालवा. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. प्रेरणादायी पुस्तक वाचा.
तूळ-आपल्याला आवश्यक असलेल्या पैशाची गरज पूर्ण होईल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्याल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येतील, व्यवसायासाठी बराच वेळ द्यावा लागेल. घरातील सदस्यांशी समन्वय राखा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा.
वृश्चिक- महत्त्वाच्या कामात विलंब होईल. त्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. तुम्हाला ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असते, अशीच माणसे ऐनवेळी कच खातील. त्यामुळे तुमचा भ्रमनिरास होईल. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल, अशी कामे करू नका.
धनु- लोकांच्या भेटीगाठी होतील. जनसंपर्क चांगला राहील. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत काही बदल होऊ शकतात. नवीन नोकरी शोधत असाल तर चांगली संधी मिळेल. जीवनसाथीचा सल्ला घ्या.
मकर- अतिशय व्यस्त राहाल, सतत काही ना काही कारणाने कामात गर्क राहाल. त्यामुळे थोडे नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यास ताण कमी होईल. प्राधान्यक्रम ठरवून काही कमी महत्त्वाची कामे पुढे डकला. महत्वाचे निरोप येतील. नवीन संधी मिळेल.
कुंभ- अनुकूल वातावरण राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. काहीना प्रवास करावा लागेल, एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. समाजात तुमचा गौरव होईल.
मीन- हाती घ्याल ते तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन कामे हातावेगळी करून टाका. रसाहक्काने मिळणाच्या उत्पन्नाचा लाभ होईल. व्यवसायात विक्री चांगली राहील.
- विजय देशपांडे ज्योतिषविशारदा