आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:55 IST2025-08-10T06:43:21+5:302025-08-10T06:55:48+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
मेष: आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. सरकारी व निम-सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील. प्राप्तीचे नवीन स्त्रोत प्राप्त होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील. सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने आपल्या कामास विलंब होईल. शरीरात स्फूर्ती व मनात उत्साह असणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. राजकीय अडचणी व्यत्यय आणतील. महत्त्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवणे हिताचे राहील. मतभेद होतील. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांचा त्रास होईल. आणखी वाचा
कर्क: आज आपल्या मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल. बाहेरील पदार्थांच्या खाण्या पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी भांडण होईल. नवे संबंध त्रासदायक ठरतील. आर्थिक चणचण भासेल. मनाला शांतात लाभण्यासाठी प्रयत्न करावेत. आणखी वाचा
सिंह: आज पती-पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी मतभेद होतील. आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळे मन प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल. सहकारी पूर्ण सहकार्य करतील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संततीकडून काही चांगली बातमी मिळेल. आपली प्रगती होईल. सहकार्य मिळेल. उत्साह व आनंदी मन ह्यांचा प्रभाव राहील. मनात सकारात्मक विचार येतील. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावे. मन चिंतीत राहील व संबंधीतांशी मतभेद होतील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. अडचणीत येण्याची शक्यता आहे. कायदेशीर कार्यवाहीत सावध राहावे लागेल. आणखी वाचा
धनु: आज आपणास एखाद्या गूढ विद्येचे आकर्षण वाटेल. भावंडांशी चांगले संबंध राहतील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी अनुकूलता लाभेल. मित्रमंडळींशी संपर्क होऊ शकेल. कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक मान-सन्मान संभवतात. आणखी वाचा
मकर: आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी ह्यात गुंतवणूक करू शकाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. काही कारणाने गृहिणींना मनात असंतोष राहील. विद्यार्थ्यांनी अधिक कष्ट घ्यावेत. नकारात्मक विचारांवर पूर्णतः संयम ठेवावा लागेल. साहसी वृत्ती असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आपल्या मनास स्पर्श करणारे विचार ऐकिवात येतील. आणखी वाचा
मीन: आज मन अशांत राहिल्यामुळे एकाग्रतेचा अभाव दिसून येईल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. स्वकियांशी मतभेद संभवतात. एखाद्या लहानशा फायद्यासाठी मोठे नुकसान होणार नाही ह्याचा विचार करावा लागेल. कोर्टाची कामे काळजीपूर्वक करावी. आणखी वाचा