आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 07:20 IST2025-11-08T07:07:49+5:302025-11-08T07:20:11+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 08 november 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य

आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य

Today Daily Horoscope: 

मेष: आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक व कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढतील. उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. अर्थविषयक कामे कराल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा 

वृषभ: महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील व त्यामुळे आलेली एखादी संधी हातून निसटेल. आपल्या हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी आपुलकी वाढल्याने अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरणात बदल होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

कर्क:  आजची सकाळ कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र, काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. हाती असलेली कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. खर्चात वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा 

सिंह:  आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. लाभ होतील. संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. एखादा प्रवास संभवतो. वैवाहिक सौख्य लाभेल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल. सामाजिक मान-सन्मान होतील. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. परदेशस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात अडचणी येतील. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती ह्यामुळे आपणास मदत होईल. आणखी वाचा 

धनु:  आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. परदेशस्थ नातेवाईकांकडून काही आनंददायी बातम्या येतील. आणखी वाचा 

मकर:  आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपार नंतर अपुरी कामे पूर्ण होतील. एखादा आर्थिक लाभ संभवतो. एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आणखी वाचा 

कुंभ: आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल. काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा 

मीन:  आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद व उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडे जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठे यश लाभेल. आणखी वाचा 

 

Open in app

Web Title : आज का राशिफल, 8 नवंबर 2025: राहत, खुशी और धन लाभ।

Web Summary : आज का दिन मिश्रित फलदायी है। कुछ राशियों के लिए खुशी, धन लाभ और पारिवारिक सद्भाव में वृद्धि होगी। कुछ को स्वास्थ्य, पारिवारिक विवादों या वित्तीय निर्णयों में चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। सकारात्मकता और आध्यात्मिक अभ्यास पर ध्यान दें।

Web Title : Horoscope for November 8, 2025: Relief, joy, and financial gains.

Web Summary : A day of mixed fortunes. Some signs will see increased happiness, financial gains, and family harmony. Others may face challenges with health, family disputes, or financial decisions. Focus on positivity and spiritual practices.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.