आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 07:10 IST2025-08-07T06:59:03+5:302025-08-07T07:10:05+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
मेष: आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात अधिकारी, विरोधक व घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले. एखाद्या मंगल कार्यास किंवा बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येईल. आणखी वाचा
वृषभ: आज कामाचा खूप व्याप व खाण्या-पिण्याची बेपर्वाही, वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत. आणखी वाचा
मिथुन: आज आपण मौज - मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक जीवनात मान - सन्मानाचे धनी बनाल. हातून दान-धर्म व विधायक कामे होतील. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
सिंह: आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. परोपकाराचे कार्य कराल. मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा
कन्या: आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उद्भवतील. पैसा खर्च होईल. आणखी वाचा
तूळ: सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा व खेळीमेळीचे वातावरण असेल. लहानशा प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. आणखी वाचा
वृश्चिक: आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. आणखी वाचा
धनु: आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी निर्माण होईल. समाजात यश व कीर्ती वाढेल. आणखी वाचा
मकर: आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. खूप कष्ट व कमी यश यामुळे निराशा निर्माण होईल. दांपत्य जीवनात खटका उडेल. आणखी वाचा
कुंभ: आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. पत्नी व संततीकडून सुख समाधान लाभेल. एखादा प्रवास किंवा सहल संभवते. विवाहेच्छुउकांचे विवाह ठरतील. शरीर व मन आनंदी राहील. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. घरात सुख शांती नांदेल. प्रगती संभवते. सरकारकडून लाभ होईल. आणखी वाचा